Join us  

देशातील प्रत्येक विद्यापीठात योग सेंटर उभारणार - प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:14 AM

योग ही भारताची शक्ती असून जगाला दिलेली भेट आहे. भारतातील प्रत्येक विद्यापीठात आंतर विद्यापीठ योग सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मुंबई : योग ही भारताची शक्ती असून जगाला दिलेली भेट आहे. भारतातील प्रत्येक विद्यापीठात आंतर विद्यापीठ योग सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून, मुंबई विद्यापीठात योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी जावडेकर बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक १५ जून ते २१ जून २०१८ दरम्यान प्रत्येक महाविद्यालयांमध्ये तीन दिवस योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना योग प्रशिक्षण दिले गेले. जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून विद्यापीठामार्फ त ३०० विद्यार्थ्यांचे योगशिबिर १५ ते २१ जून दरम्यान आयोजित केले गेले. या शिबिरात १५० महाविद्यालयांतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांसह दहा प्राध्यापक सहभागी झाले.यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांच्यासह कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांचीही उपस्थिती होती.

टॅग्स :योग