Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुट्टीवर: रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

मुंबई : बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे आंदोलन आणि ...

मुंबई : बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे आंदोलन आणि निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत सुरू राहावा यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियातून ही घोषणा केली. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आज सकाळी आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे आपल्या सुट्टीची घोषणा केली होती. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहे. रेखा ठाकूर यांच्याकडे प्रभारी पद देण्यात आले असून, अरुण सावंत आणि जिल्हा कमिटी त्यांना सहकार्य करतील, असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आंबेडकर यांच्यावर हृदयविकारासंबंधित एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना आरामाची आवश्यकता असल्याने सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.