Join us  

वीज कामगार प्रकाशगडावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:11 AM

मुंबई : विद्युत मंडळाच्या विभाजित महावितरण/महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील स्थायी कामगार, कंत्राटी, आउट-सोर्सिंग कामगार, सुरक्षा रक्षक व शिकाऊ उमेदवार हजारोंच्या संख्येने गुरुवारी, २८ डिसेंबरला ‘प्रकाशगडा’वर धडकणार आहेत.

मुंबई : विद्युत मंडळाच्या विभाजित महावितरण/महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील स्थायी कामगार, कंत्राटी, आउट-सोर्सिंग कामगार, सुरक्षा रक्षक व शिकाऊ उमेदवार हजारोंच्या संख्येने गुरुवारी, २८ डिसेंबरला ‘प्रकाशगडा’वर धडकणार आहेत. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसह कंत्राटी व खाजगीकरणाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी कामगार निदर्शने करणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.प्रशासनाने खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, ही कामगारांची प्रमुख मागणी असल्याचे फेडरेशननेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :आंदोलन