Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित बातमीत वापरण्यासाठी....

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST

(वीज पुरवठा खंडित बातमीत वापरण्यासाठी....)

(वीज पुरवठा खंडित बातमीत वापरण्यासाठी....)

लाईट अभावी वाहतूक आणि मोबाईल सेवा ठप्प

चेंबूर: शहारातील अनेक भागात मंगळवारी अचानक लाईट गायब झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोर जावे लागले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चेंबूर परिसरात लाईट गेली होती. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सिग्नल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी चेंबूर कॅम्प, चेंबूर नाका सिग्नल आदी ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी या परिसरात जाऊन वाहतूक सुरळीत केली. त्यातच अनेक कंपन्यांचे मोबाईल टॉवर देखील लाईट नसल्याने बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय या भागातील अनेक परिसरात सार्वजनिक गणेश मंडळ आहे. या मंडळांचे लाऊड स्पीकरही पूर्णपणे बंद झाले होते. चेंबूरच्या साठेनगर, रामटेकडी, चेंबूर स्थानक या परिसरात लाईट होती. अखेर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा सर्व विद्युत सेवा सुरळीत झाली. मात्र, ५ वाजता पुन्हा लाईट गेल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.