Join us

भाजपाला गचांडी देत सेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता?

By admin | Updated: August 9, 2014 00:57 IST

स्वबळाचा नारा देणा:या भाजपाचे लोढणो भिरकावून ठाणो महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याचा गेम शिवसेनेने ‘सत्ते पे सत्ता’ या खेळीद्वारे रचला आहे.

ठाणो : एकीकडे शहर कार्यकारिणी अस्तित्वात नसतानाही शत:प्रतिशत आणि स्वबळाचा नारा देणा:या भाजपाचे लोढणो भिरकावून ठाणो महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याचा गेम शिवसेनेने ‘सत्ते पे सत्ता’ या खेळीद्वारे रचला आहे. मतदारांनी जरी शिवसेनेला बहुमताइतके म्हणजे 65 नगरसेवकांचे संख्याबळ दिलेले नसले तरी ते विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या माध्यमातून मिळवायचा चंगही सेनेने बांधला आहे. सत्तेतला जो वाटा भाजपाला देतो तो वाटा या नव्याने आलेल्या नगरसेवकांना आळीपाळीने देऊन सर्व सत्ता आपल्या हाती एकवटण्याची ही खेळी आहे.
कालच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणो जे नवीन 7 नगरसेवक सेना आपल्याकडे खेचू पाहत आहेत त्यांना द्यायचे काय? आणि त्यांना दिले तर अलीकडेच आलेल्या 7 जणांना काय द्यायचे? व त्यांचा हिस्सा दिल्यावर उरणार काय? व त्यातून आपल्या नगरसेवकांना काय द्यायचे? शिवाय भाजपाचा वाटा आहेच आणि अपक्षही सतत हात पसरून असतोच. या तिढय़ामुळे या नव्या सत्त्याचा सेनेतला प्रवेश रखडला होता. परंतु मातोश्रीवर असा विचारप्रवाह मांडला गेला की, भाजपाच्या चिल्लर कुबडीच्या आधारे महापालिकेतील सत्ता चालविण्यापेक्षा या कुबडय़ांची गरज भासणार नाही. इतक्या संख्येने अन्य पक्षांचे नगरसेवक शिवसेनेत आणावे व सत्तेतला जो वाटा भाजपाला देतो, तो वाटा आळीपाळीने नव्याने पक्षात आलेल्यांना द्यावा. म्हणजे एकाच वेळी एका दगडात दोन पक्षी मारले जातील, अशी ही फिल्डिंग आहे.  भाजपाने मनसेशी चुंबाचुंबी करून सेनेला जसे नाशिक महापालिकेत वेगळे पाडले, तशीच खेळी ठाणो महापालिकेत आपण खेळावी व सेना-भाजपाला जशास तसे उत्तर द्यावे असेही या खेळीत अपेक्षित आहे. असे घडले तर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष औषधापुरतेच शिल्लक राहतील. ठाणो महानगरात भाजपाची कार्यकारिणी नाही. अस्तित्वही क्षीण झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
च्ठाणो महानगरात भाजपाची कार्यकारिणी नाही. अस्तित्व क्षीण झाले आहे तशात महापालिकेतील सत्तेचा वाटा जर हातून गेला तर तिची अवस्था अधिकच दारुण होणार आहे.
 च्आता या सत्तेच्या खेळात भाजपाची अवस्था कशी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.