मुंबई : भाडेवाढ टाळण्यासाठी दीडशे कोटींचे अनुदान मागणा:या बेस्ट उपक्रमाला पालिकेने पिटाळले आह़े एमएमआरडीएकडेच दीडशे कोटींचे अनुदान मागा, असा अजब सल्ला देऊन स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बेस्टच्या तोंडाला आज पाने पुसली़ मात्र पालक संस्थेनेच असे झुलविल्यामुळे बेस्टकडे भाडेवाढ करण्यावाचून पर्याय उरलेला नाही़
गतवर्षी निवडणुकीच्या काळात भाडेवाढ टाळण्यात आली तरी बेस्टचे आर्थिक नुकसान काही कमी झालेले नाही़ त्यामुळे पुढच्या वर्षी बेस्टने दोन वेळा भाडेवाढ सुचविली आह़े ही भाडेवाढ टाळायची असल्यास गतवर्षीप्रमाणोच दीडशे कोटींचे अनुदान देण्याची मागणी बेस्ट प्रशासनाने केली होती़ मात्र या मागणीला सत्ताधा:यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या़
बेस्टच्या सन 2क्15-2क्16 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्थायी समिती अध्यक्षांनी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा ही मेट्रोच्या मार्गावर चालविण्यात येणारी बससेवा तोटय़ात असल्यामुळे ही सेवाच ताब्यात घेऊन आर्थिक संकटातून सुटका करून घ्या, असे उपदेश त्यांनी दिल़े एमएमआरडीएकडे अनुदान मागण्याचा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत़
पालिकेने यापूर्वी बेस्टला 16क्क् कोटींचे कर्ज दिले आह़े तर गतवर्षी निवडणुकीच्या काळात भाडेवाढ टाळण्यासाठी दीडशे कोटींचे आश्वासन पालिकेने दिले होत़े यापैकी 37़5क् कोटींचा पहिला हप्ता देण्यात आला़, तर 19 कोटींचा दुसरा हप्ता देण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर झाला आह़े (प्रतिनिधी)