Join us

पोस्ट कर्मचाऱ्यांची आज निदर्शने, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:21 IST

पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत.

मुंबई : पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास, २० जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.अनुकंपा तत्त्वावरील सर्व रिक्त जागा, ग्रामीण डाक सेवकांच्या सर्व रिक्त जागा भराव्यात, नवीन भरती होईपर्यंत पोस्टमन व एमटीएसच्या रिक्त पदावर रोजंदारी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करावेत, रोजंदारी कर्मचाºयांच्या रोजंदारी दरात वाढ करावी, त्यांना पार्ट टाइम कॅज्युअल लेबरचा दर्जा द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी निदर्शने करणार असल्याची माहिती एस. जी. काळोखे यांनी दिली. याबाबत महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांना २१ जून रोजी नोटीस देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई