दीपाली दिवेकर (समुपदेशक)विद्यापीठातील अभ्यासक्रम फक्त बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, असा समज असतो़ पण काही विद्यापीठांत दहावीनंतरचे काही अभ्यासक्रम उपलब्ध असतात. दहावीनंतर अकरावी आणि बारावी असे न करता पदविकांचा पर्याय निवडता येऊ शकतो. त्यापैकी काही अभियांत्रिकी तर काही बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहेत.ललित कलाया शाखेत पेंटिंग्ज, स्कल्पचर, मेटल वर्क, सिरॅमिक्स, टेक्सटाइल, डिझायनिंग, इंटिरिअर डेकोरेशन, अॅप्लाइड आर्ट हे पर्याय उपलब्ध आहेत. डिझायनिंग यामध्ये अॅनिमेशन अॅन्ड फिल्म सिरॅमिक अॅन्ड एक्झिबिशन, फिल्म अॅन्ड व्हिडीओ कम्युनिकेशन, फर्निचर ग्राफिक, टेक्सटाइल, अॅपरेल, डिजिटल गेम, टॉय याखेरीज आर्किटेक्चर, कृषीक्षेत्र, पत्रकारिता, व्यवस्थापन, गृहविज्ञान, योग, कायदा क्षेत्र, ग्रंथालय, नृत्य, नाट्य, गायन, अभिनय, वादन या क्षेत्रांमध्ये करिअर करता येईल. इतकी सारी करिअर क्षेत्रे असल्यानंतर त्यापैकी आपल्यासाठी कोणते योग्य हे ठरवताना गोंधळ होणे स्वाभाविकच आहे. त्या दृष्टीने इयत्ता ११वी व १२वीत विषय किंला शाखा निवडताना आपल्याला पुढे काय करायचे आहे, त्यानुसार विषय व शाखा निवडावीस त्यासाठी काही बेसिक गोेष्टी लक्षात ठेवायला हव्यात. काही पर्याय सिव्हिल, कन्सट्रक्शन, प्लॅस्टिक, केमिकल, कॉम्प्युटर, इन्फ र्मेशन, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल , इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, पॅकेजिंग, फॅब्रिकेशन, मेटॅलर्जी, मायनिंग, प्रिंटिंग, गारमेंट, टेक्सटाइल, निटिंग, ड्रेस डिझायनिंग, फॅशन अॅन्ड क्लोजिंग, ट्रॅव्हल अॅन्ड टुरिझम, मरिन, लेदर गुड अॅन्ड फूटवेअर, फूड टेक, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग, सरफेस कोटिंग, रबर टेक्नॉलॉजी, फॉर्मसी, अॅग्रो, एन्व्हायर्नमेंटल अर्किटेक्चर, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी यांची प्रवेश प्रक्रिया व प्रवेश पात्रताविषयक अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाइट उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम(एचएससी व्होकेशनल) यामध्ये व्यवसाय विषयाची व्याप्ती ७० टक्के असून प्रात्यक्षिकांसाठी भरपूर सराव मिळतो. उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रमात दोन भाषा व एक पायाभूत अभ्यासक्रम (जनरल फाउंडेशन कोर्स ) याचा समावेश होतो. १२वीची अंतिम परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतली जाते. प्रशिक्षण कालावधीमध्ये कारखान्यात, उद्योगात प्रत्यक्ष कामाच्या जागी ‘आॅन जॉब ट्रेनिंग’ची सोय असते. यात पुढील पर्याय उपलब्ध आहेत़१) तांत्रिक गट - मेंटेनन्स अॅन्ड रिपेअरिंग आॅफ इलेक्ट्रिकल अॅप्लायन्सबिल्डिंग मेंटेनन्स, कॉम्प्युटर मेंटेनन्स, मल्टी मीडिया इंटरनेट टेक्नॉलॉजी,इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमेकॅ निकल टेक्नॉलॉजीआॅटो इंजिनीअरिंग टेक्निशिअन,रिपेर्स, मेंटेनन्स अॅन्ड रिवायन्डिंग अॉफ इलेक्ट्रिक मोटर २) वाणिज्य गट - पर्चेसिंग अॅन्ड स्टोअर कीपिंगमार्केटिंग अॅन्ड सेल्समनशिप, अकाउंटिंग अॅन्ड आॅडिटिंग आॅफिस मॅनेजमेंट, इन्शुरन्स, बँकिंग३ ) मत्स्य गट - मत्स्य प्रक्रिया तंत्रमत्स्य उत्पादक ४) कृ षी गट - १) हॉर्टिकल्चर २) क्रॉप सायन्स३) डेअरी टेक्नॉलॉजी४) पोल्ट्री प्रोडक्शन ५) सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी६) वॉटर शेड मॅनजमेंट७) पोस्ट हर्विस्ट टेक्नॉलॉजी ५) आरोग्य व वैद्यकीय सेवा गट १) क्रेच अॅन्ड प्री स्कूल मॅनेजमेंट (केवळ महिलांसाठी)२) आॅप्थॅल्मिक टेक्निशिअन३) एक्स रे टेक्निशिअन४) मेडिकल लॅब टेक्निशिअन ६) गृहविज्ञान गट १) ट्रॅव्हल अॅन्ड टुरिझम २) बेकरी अॅन्ड कन्फेक्शनरी३) कूकरीया माध्यमातून १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षासाठी शिकाऊ उमेदवारी करण्याची संधी असून प्रशिक्षण काळात रु. १,४४० मासिक विद्यावेतन अनुज्ञेय आहे. -------आयटीआयमधील तांत्रिक अभ्यासक्रम-औद्योगिक क्षेत्रात मूलभूत कौशल्यांची जण असलेल्या, तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी मंत्रालयातर्फे ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ची सुरुवात झाली. त्या अंतर्गत इयत्ता ८वीनंतर, १० वीनंतर व इयत्ता १२ वीनंतर अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी गटात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. --------> मेडिकल, पॅरामेडिकल, पशुवैद्यक यासाठी १२वीला भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व जीवशास्त्र आवश्यक > इंजिनीअरिंग, एनडीए (हलाई दल व नौदल ) यासाठी भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित आवश्यक > कृषी अभ्यासक्रम आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र आवश्यक फार्मसीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र किंवा गणित विषय आवश्यक> आर्किटेक्चर, अॅक्चुरिअल सायन्स, बी - स्टॅटस्टिक्स, बी- मॅथॅमॅटिक्स, बी.एस.सी आयटी, बीसीएसाठी, १२वीला मॅथ्स असणे आवश्यक आहे.> फाइन आर्ट्स, डिझायनिंग प्रवेशासाठी १२वी कोणतीही शाखा चालेल. एचएससी व्होकेशनल सुद्धा चालेल़ वर उल्लेख केलेल्या प्रत्येक करिअरसंदर्भात सविस्तर माहिती, त्या त्या क्षेत्रासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश पात्रता, नोकरी व व्यवसायाच्या संधींसंबंधि संपर्कासाठी वेबसाइट्स या बाबींची माहिती आपण येत्या काही दिवसांमध्ये घेणार आहोत. तसेच करिअर निवडताना कोणते मुद्दे विचारात घ्यावे हेही पाहणार आहोत. तोपर्यंत या सर्व पर्यायांचा विचार करा़ स्वत:ला काय करायला आवडेल याचाही शोध घ्या.
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय
By admin | Updated: June 8, 2015 03:40 IST