Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची आयात वाढण्याची शक्यता

By admin | Updated: October 2, 2014 23:56 IST

भारतातील सोन्याची आयात वाढून जवळपास 7क् ते 75 टन प्रतिमहिना होऊ शकते.

मुंबई : भारतातील सोन्याची आयात वाढून जवळपास 7क् ते 75 टन प्रतिमहिना होऊ शकते. सध्या ही सरासरी 5क् ते 65 टन प्रतिमहिना एवढी आहे. सुवर्ण उद्योग क्षेत्रतील एका पदाधिका:याने ही माहिती दिली.
भारतीय सराफा व आभूषण संघटनेचे प्रवक्ता हरमेश अरोडा यांनी सांगितले की, देशात सुवर्ण व आभूषण व्यापारात मोठा जोश आहे. त्यामुळे सोन्याची आयात वाढून प्रतिमहिना 7क् ते 75 टक्क्यांवर जाण्याची शक्यता बळावली आहे. सध्या प्रतिमहिना 5क् ते 65 टन सोन्याची आयात होते.
भारतीय रिझव्र्ह बँकेने व्यापारी व आणखी काही बँकांना परदेशात सोने खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. 
या पाश्र्वभूमीवर जगभरात सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून ओळखल्या जाणा:या भारतात सोन्याच्या आयातीमध्ये अलीकडील महिन्यात वाढ झाली आहे. यामुळे देशाचा व्यापार तोटा 11 महिन्यांच्या उच्चंकावर पोहोचला आहे.
सोन्याची आयात वाढल्यास भारत सरकारच्या चालू खात्यातील तोटय़ात वाढ होईल. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
 
4संघटनेद्वारे येत्या 4 व 5 ऑक्टोबर रोजी भारत आंतरराष्ट्रीय सराफा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
4या परिषदेत भारत आणि अन्य देशांतील विशेषज्ञ सहभागी होतील. सराफा व आभूषण उद्योगात थेट परकीय गुंतवणूक अर्थात एफडीआयशिवाय अन्य प्रासंगिक मुद्यांवर या परिषदेत चर्चा होईल.