नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर तुर्भे उड्डाणपुलाजवळ अर्धवट स्कायवॉक बांधण्यात आला आहे. नागरिकांना अर्धा रस्ता जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागत आहे. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. रुंदीकरणाचे काम संपले नसतानाच खारघरमध्ये टोलनाका सुरू करण्यात आला आहे. रुंदीकरण करताना आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल, पादचारी पूल व स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळही एक स्कायवॉक तयार केला आहे. सानपाडा गावातून येणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडता यावा यासाठी ही सोय केली आहे. परंतु या पुलाचे नियोजन पूर्णपणे चुकले आहे. उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गिकेपर्यंतच पूल तयार केला आहे. यामुळे गावातून येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. नंतर अर्ध्या रोडसाठी पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. नियोजन करताना चूक झाली आहे. शासनाने अर्धवट राहिलेला स्कायवॉक पूर्ण करावा अन्यथा गंभीर अपघात होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
अर्धवट स्कायवॉकमुळे अपघातांची शक्यता
By admin | Updated: May 3, 2015 23:28 IST