Join us

सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे

By admin | Updated: July 14, 2015 01:39 IST

सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकानेच प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक

मुंबई : सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकानेच प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये रविवारी घडली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी हर्षल पवार (२१) या प्रशिक्षकाला अटक केली.मुलुंड पूर्वेकडील वामनराव मुरांजन विद्यालयात अर्जुन अ‍ॅकेडमी अंतर्गत सैनिकी पूर्वप्रशिक्षण दिले जाते. सध्या तिथे १२ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सकाळी ८ ते दुपारी १२.३० दरम्यान वर्ग भरतो. सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी घेऊन नाहूरमधील १२वर्षीय मिनूने (नाव बदललेले आहे) तीन दिवसांपूर्वी या अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत आणखी एका १३ वर्षांच्या मुलानेही प्रवेश घेतला होता. दोघेही नवखे असल्याचा फायदा घेत पवार दोघांना जास्त वेळ थांबवत होता. अन्य विद्यार्थी गेल्यानंतर त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. सुरुवातीला पवारच्या विचित्र वागणुकीकडे या दोघांनी दुर्लक्ष केले. मात्र रविवारी त्याने मिनूसह त्या मुलावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दोघांनीही तेथून पळ काढला आणि घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पालकांना दिली.मिनूने पालकांसह नवघर पोलीस ठाणे गाठून झालेला घटनाक्रम सांगितला. विनयभंग आणि पॉस्को कायद्यान्वये पवारविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पवारला अटक केली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)