Join us

अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:45 IST

महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका कलाकाराला अटक केली. करण कपूर ऊर्फ करण राय चंदानी असे त्याचे नाव आहे.

मुंबई : महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी एका कलाकाराला अटक केली. करण कपूर ऊर्फ करण राय चंदानी असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी पोलिसांनी करणला अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
एका महिलेने एप्रिल महिन्यात करण कपूरविरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र  अटकेच्या भीतीने तो  राहण्याचे ठिकाण बदलत होता. अखेर त्याला शुक्रवारी अटक झाली. (प्रतिनिधी)