Join us

वाढू लागली बाल कलाकारांची लोकप्रियता

By admin | Updated: November 14, 2014 01:31 IST

डेझी इराणी ते मास्टर अलंकार आणि ज्युनियर मेहमूद ते मास्टर सचिन (आताचा सचिन पिळगावकर) अशा अनेक बाल कलाकारांना रुपेरी पडद्याने अभिनयाची संधी दिलीये.

 पूजा सामंत - मुंबई
डेझी इराणी ते मास्टर अलंकार आणि ज्युनियर मेहमूद ते मास्टर सचिन (आताचा सचिन पिळगावकर) अशा अनेक बाल कलाकारांना रुपेरी पडद्याने अभिनयाची संधी दिलीये. त्यांच्यातील अभिनय निपुणता दर्शवण्याची संधी नंतरच्या काळात छोटय़ा पडद्याने दिलीये. मोठय़ा पडद्यावरील काही बाल कलाकारांना पालकांच्या आणि त्यांच्या स्वत:च्याही पोटाची खळगी भरण्यासाठी अभिनयाची वाट धरावी लागली, ज्यात मीनाकुमारी ते मधुबाला अशा अनेक लोकप्रिय नावांचा समावेश होतो. आज काळाने उत्तुंग ङोप घेतलीये. आज जे काही बाल कलाकार मोठय़ा आणि छोटय़ा पडद्यावर अभिनयाच्या विश्वात रमलेले दिसताहेत, त्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे. मुलांना लागलेलं अभिनयाचं व्यसन  म्हणा किंवा आवड, चटक म्हणा किंवा त्यांच्या पालकांची हौस असा राजीखुशीचा मामला सरळ-सरळ दिसून येतोय. 
बहुतेक मालिका या डेली सोप्स असल्याने या बाल कलाकारांचंही काम मुख्य कलाकारांइतकं महत्त्वाचं असतं, या बाल कलाकारांच्या शाळा-स्पोर्ट्स, परीक्षांची वेळापत्रकं सांभाळून निर्मात्यांना त्यांच्या डेट्स आधी घ्याव्या लागतात, असं चित्र दिसून येतंय. वाहिन्यांवरील लोकप्रिय बाल कलाकारांनी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत कार्यालयास भेट दिली आणि हसत-खेळत गप्पाटप्पा केल्यात.
असनोर कौर ही बाल कलाकार सध्या ‘तुम साथ हो जब अपने’ या सोनी पल वाहिनीच्या मालिकेत अतिशय व्यस्त असून लखनवी मुस्लीम बालिकेची भूमिका करताना तिने उर्दू लहेजा शिकण्यासाठी संवादांची घोकंपट्टीच नव्हे तर सेटवर पोहोचण्याआधी निर्मात्यांकडे संवादाची नेहमीच मागणी केलीये, असनोर या 11 वर्षीय बाल कलाकाराची आई सांगत असते. दिल्लीत सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणो या पंजाबी कुटुंबातील ही बालिका शाळेच्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेताना आघाडीवर असे. मुंबईत एकदा कॉन्टिलो फिल्म्सच्या मालिकेतील बाल कलाकार आजारी पडला आणि ऐनवेळी असनोरला कार्यकारी निर्मात्याने ती भूमिका करशील का, विचारलं आणि पुढचा अभिनय प्रवास घडत गेला.
असनोरचे वडील टाटा कन्सल्टन्सीमध्ये अभियंते आहेत तर आई गृहिणी. अभिनयाचे बाळकडू तिच्यात कसे काय उतरले हे मोठेकोडेच आहे, असे असनोरची आई हसत सांगते. असनोरने ‘झांसी की रानी मालिकेत’, त्याचप्रमाणो ‘शोभा सोमनाथ की’ मालिकेत मुख्य भूमिका केल्यात. सोमनाथ या मालिकेत बाल सोमनाथाची भूमिका करताना असनोरला तळपत्या उन्हात राजस्थान-जयपूरच्या रेतीत तांडव करायचे होते.. ते तिने कुशलतेने पार पाडले. शूटिंग संपल्यानंतर सगळ्यांच्या ध्यानात आले, तिचे पाय प्रचंड पोळलेत..      असनोरचे पाय पाळण्यात दिसतात. भविष्यात तिचं पदार्पण रुपेरी पडद्यावर झालं तरी नवल वाटणार नाही.   मेरा चिल्ड्रन्स डे.. आईस्क्रीम के बिना पूरा नही होगा..  प्रसिद्ध बाल कलाकार साधिल कपूर लोकमत कार्यालयात खुशीत सांगत असतो. अनेक मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या 9 वर्षीय साधिलचं बालमन सध्या बालिदनानिमित्त त्याच्या शाळेत आयोजित होत असलेल्या डान्स कॉम्पिटिशनकडे लागलंय. साधिलने स्पर्धेची कसून तयारी केली आहे. डिस्ने वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम कॅप्टन ताओचं संचालन साधिल यशस्वीपणो करतोय. साधिलचं म्हणणं असं, शाळेत गृहपाठाऐवजी विविध अॅक्टिव्हिटीज करून घ्याव्यात. 
त्यात सहभाग घेणं मुलांना खूप आवडतं. 
गणितासारखा विषय ऐच्छिक असावा.. साधिलने आपलं मत 
व्यक्त केलं आणि तो मनमुराद 
हसला. साधिलच्या कार्यक्रमात आजवर अनेक फिल्मी सेलीब्रेटीजनी हजेरी लावलीये. पुढे तू काय 
करायचं ठरवलंस या प्रश्नावर साधिल म्हणतो, पापा कहते है बडा नाम करेगा.. त्यामुळे मी कशात करिअर करेन हे माझं नक्की ठरलेलं नाहीये.. बाल कलाकारांची व्यस्तता त्यांना स्टारडम मिळवून देतेय खरी, पण प्रसिद्धीचा हा मार्ग तितकाच धोकादायक असू शकतो, याची जाणीव त्यांच्या बालमनाला नाही.. हेही तितकंच खरंय.
 
च्छोटय़ा पडद्यावर दर दिवशी नव्या वाहिन्यांचा सुकाळ आणि निर्माण होणा:या शेकडो मालिका यात खूपशा मालिकांमध्ये बाल कलाकारांना वाव मिळेल, अशा भूमिका असतात, आहेत. 
च्कलर्स वाहिनीला ज्या मालिकेने शिखरावर नेलं, त्या मालिका म्हणजे ‘बालिका वधू’ आणि ‘उतरन’. बालिका वधूमुळे अक्षरश: घरोघरी पोहोचलेली आनंदी ऊर्फ अविका गोर आणि जगदीशची भूमिका रंगवलेला बाल कलाकार शशांक व्यास प्रचंड लोकप्रिय ठरलेत. 
च्आज अविका गोर अनेक मालिकांमध्ये मध्यवर्ती भूमिका करताना दिसतेय, तर शशांक व्यासदेखील व्यस्त आहे.