कर्जत : कर्जत - चौक हा राज्य मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: खड्डे मार्ग बनला होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले होते की नऊ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा - पाऊण तास लागायचा. परिणामी त्या भागातील वावर्ले, बोरगाव येथील ग्रामस्थांनी वावर्लेचे उपसरपंच पप्पू विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. अखेर एमएमआरडीए प्रशासनाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करणा:या ठेकेदाराला खड्डे भरण्याचे आदेश दिले. त्यामुळे अखेर खड्डे भरण्याला मुहूर्त मिळाला.
कर्जत-चौक राज्यमार्गावरील खड्डे भरण्याचे काम एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरु करण्यात आल्याने परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका एमएमआरडीएने मुंबईमधील सुप्रीम इंजिनीयर कंपनीला दिला होता. ठेकेदार कंपनीने रस्त्यावरील अतिक्रमणो यांचा मुद्दा पुढे करीत अनेक महिने रस्त्याचे काम सुरू केले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ठेकेदाराने रस्त्याचे काम काही भागात सुरू केले. ते करताना जुना रस्ता अनेक ठिकाणी खोदून त्यावर डांबरीकरणाचा पहिला लेअर टाकला. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे रस्ते पुन्हा खड्डेमय झाले.
वाहन चालक आपली लहान वाहने घेवून जाण्यास कचरत असून केवळ अवजड वाहनांकडूनच या रस्त्याचा वापर होत आहे. तर अनेकांनी वाहतुकीसाठी सार्वजनिक यंत्रणोचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे शेवटी चौक-कर्जत मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीमधील रहिवाशांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाची दखल एमएमआरडीएने घेऊन त्वरित रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंते पाठविले आणि ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहे. यावेळी आंदोलनकत्र्यानी ठेकेदार असलेल्या सुप्रीम इंजिनीयर कंपनीला काळय़ा यादीत टाकण्याची मागणी केली आहे.