नागपूर : भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून खा. पुनम महाजन यांची एकमताने निवड झाली आहे. महासचिवपदी रुपम हरीश शर्मा सचिवपदी निवड करण्यात आली. महत्त्वाच्या दोन्ही पदांवर महिला प्रमुख असलेला बास्केटबॉल महासंघ ही देशातील एकमेव राष्ट्रीय क्रीडा संघटना आहे.१९५० पासून अस्तित्वात असलेल्या फेडरेशनच्या प्रमुखपदी महिलेची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यात शनिवारी पार पडलेल्या महासंघाच्या आमसभेत महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या अध्यक्ष, भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार ३४ वर्षांच्या पुनम महाजन यांची प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली. पुढील चार वर्षे पदावर राहणाऱ्या महाजन सर्वांत तरुण अध्यक्ष बनल्या.बीएफआयच्या २६ सदस्यीय कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. त्यात आसामचे मुकुट मेधी यांच्याकडे खजिनदार पदाची सूत्रे सोपविण्यात आली.आमसभेत ३२ पैकी २२ संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील चार वर्षांसाठी निवडण्यात आलेली बास्केटबॉल महासंघाची कार्यकारिणीं अशी : अध्यक्ष खा.पुनम महाजन महाराष्ट्र, वरिष्ठ उपाध्यक्ष आर, एस. चहल, उपाध्यक्ष(महिला) नंदिनी बसप्पा, उपाध्यक्ष (पाच पदे) अशोक कुमार साहू, राजेश पटेल, अजितसिंग राठोड, दलबिरसिंग खरब, विनोद वाच्छानी, महासचिव रुपम हरीश शर्मा आदींचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
बास्केटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी पूनम महाजन
By admin | Updated: March 29, 2015 01:08 IST