Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजित अग्रवालचा जामीन नाकारला

By admin | Updated: February 3, 2017 01:10 IST

आॅर्बिट ग्रुपचा एमडी पूजित अग्रवालचा जामीन अर्ज गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याला अटक केली होती. यापैकी एका

मुंबई : आॅर्बिट ग्रुपचा एमडी पूजित अग्रवालचा जामीन अर्ज गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याला अटक केली होती. यापैकी एका गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.पूजित अग्रवालला बँकिंग व्यवहारांमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याला ४० फ्लॅटधारकांची ५२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी गेल्या पाच महिन्यांपासून तो कोठडीत आहे. अग्रवालने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गुरुवारी सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजित अग्रवालच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)