ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे करण्यात येणा-या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा व आरती करण्यात येते. मात्र राज्यात नवे सरकार नुकतेच स्थापन झाले असून उपमुख्यमंत्री कोण याची घोषणा अद्यापही झालेली नाही. त्यामुळे हा मान मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला आला. येत्या ३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून विठ्ठल मंदिराच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा मान त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नेते एकनाथ खडसे यांना बहाल केला असून ३ नोव्हेंबरला पहाटे खडसे ही पूजा करतील.