Join us

पूजा भट्ट पती मुनीशपासून विभक्त

By admin | Updated: December 9, 2014 01:14 IST

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री -चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट पती मुनीश माखिजापासून विभक्त झाली आहे.

मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री -चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट पती मुनीश माखिजापासून विभक्त झाली आहे. तिने टि¦टरवर या संदर्भात टि¦ट केले आहे. 11 वर्षापूर्वी 2क्क्3 च्या ऑगस्ट महिन्यात पूजा आणि मुनीश  यांचा विवाह गोव्यात झाला होता. 
पूजा आणि मुनीश यांची पहिली भेट गोव्यातच झाली. तेथे त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी पूजाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा आमचा निर्णय संयुक्तिक आहे, असेही टि¦टरवर म्हटले. 
काही तात्त्विक मतभेदांमुळे आम्ही विभक्त झालोत, असे पूजाने आज लोकमतला सांगितले. पूजा आणि मुनीश यांना अपत्य नाही. (प्रतिनिधी)