Join us  

मुंबईत ‘प्रदूषणसदृश्य’ वातावरण; ‘सफर’च्या मते हवा समाधानकारक, आजचे वातावरण ढगाळ राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 1:21 AM

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदवण्यात आले.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान बदलाचा परिणाम म्हणून बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरातील हवामान ढगाळ नोंदविण्यात आले. विशेषत: संपूर्ण मुंबई ‘प्रदूषणसदृश्य’ वातावरणात हरवली आहे असे वाटत असले तरी ‘सफर’ या संकेतस्थळावर मुंबईतील बहुतांश ठिकाणचे वातावरण मध्यम आणि समाधानकारक नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदवण्यात आले.याचप्रमाणे गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे; उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.कोकणाला पावसाचा इशारा५ डिसेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.६ आणि ८ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.आज मुंबई ढगाळ राहणारबुधवारी दुपारच्या सुमारास मुंबईत ढगाळ वातावरण होते. बुधवारप्रमाणेच गुरुवार, ५ डिसेंबर रोजी मुंबई अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाणपार्टिक्युलेट मॅटरमध्ये (पीएम)कुलाबा ३८ - उत्तममाझगाव ६० - समाधानकारकवरळी ५९ - समाधानकारकचेंबूर ६६ - समाधानकारकबीकेसी १२६ - मध्यमअंधेरी ९३ - समाधानकारकभांडुप ५८ - समाधानकारकमालाड ८४ - समाधानकारकबोरीवली ६६ - समाधानकारकनवी मुंबई ९८ - समाधानकारकहवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाणचांगली :० ते ३०समाधानकारक :३० ते ६०मध्यम :६० ते ९०वाईट :९० ते १२०अत्यंत वाईट :१२० ते २५०तीव्र :२५० ते ३८०हवेची गुणवत्ता (स्रोत : सफर)

टॅग्स :मुंबई