Join us
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी सरसावले राजकीय पक्ष

By admin | Updated: January 14, 2015 02:52 IST

मकरसंक्रांतीला पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा मांजा आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचा काळ बनत आहे.

मुंबई : मकरसंक्रांतीला पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा मांजा आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचा काळ बनत आहे. पक्ष्यांवरील ही संक्रांत टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या जोडीने आता राजकीय पक्षही पुढे सरसावले आहेत. नायलॉनच्या मांजामुळे गतवर्षी अडीचशेहून अधिक पक्षी मृत झाले, तर शेकडो जखमी झाले. ही कत्तल रोखण्यासाठी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसने जनजागृती मोहीम आखली आहे. त्यासाठी १४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पक्ष्यांच्या वेशातील शाळकरी मुलांकडून तीळगूळ वाटून ‘पतंगबाजी थांबवा, पक्षी वाचवा’ असा संदेश देण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे दुर्घटनेत हात गमावलेली मोनिका मोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. आरपीआयनेही ‘लेट मी फ्लाय’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.