मुंबई : आघाडी सरकारमध्ये महामंडळे, विविध समित्यांवर करण्यात आलेल्या नेमणुका रद्द करण्याचा सपाटा राज्यातील भाजपा सरकारने लावला आहे. विशेषत: महामंडळांवरील नेमणुका एकामागून एक रद्द करणो सुरु झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांची सिडकोच्या अध्यक्ष पदावरील नियुक्ती रद्द केली आहे. हिंदुराव हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जात होते. सर्व महामंडळांवरील नेमणुका रद्द केल्या आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यांवरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाने गुरुवारी रद्द केल्या.
या राजकीय स्वरुपाच्या नियुक्त्या आघाडी सरकारच्या काळात केल्या होत्या. आता नवे सरकार आपल्या पसंतीनुसार लवकरच नेमणुका करेल. या समित्यांवरील नेमणुका पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी करीत असतात. पक्षातील लहान कार्यकत्र्याची संजय गांधी निराधार वा दक्षता समितीवर नियुक्तीसाठी धडपड असते. आपले सरकार आल्याने आपली नेमणूक होऊ शकेल, अशी भाजपाच्या कार्यकत्र्याना आशा आहे. (विशेष प्रतिनिधी)