Join us  

राज्यात १० मार्चला पोलिओ लसीकरण अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:26 AM

राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात १० मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे १ कोटी २२ लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ५ वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची स्थापना केली आहे. सुमारे ८२ हजार ७१९ पोलिओ बुथ उभारण्यात येतील. त्यासाठी २ लाख १९ हजार ३१३ कर्मचारी नियुक्त केले आहेत.