Join us
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसाला चपलांचा मार

By admin | Updated: February 23, 2017 00:46 IST

मुलीला छेडल्याचा आरोप : बसस्थानकात चालला गोंधळ

जळगांव : बसमध्ये मुलीला स्पर्श केल्याचा आरोप करुन मुलीच्या आईने व तिच्या नातेवाईकांनी पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीला चपलाने चोपल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजता जळगाव बसस्थानकावर घडली. दरम्यान, पश्चिम बंगालचा हा व्यक्ती पत्नीसह अजिंठा लेणी पाहण्यासाठी आला होता. तो स्वत:ला पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत होता.औरंगाबाद -जळगाव या बसमध्ये हा वाद झाला.  दोघांमध्ये जागेवरुन वाद झाल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे, तर महिलेसोबत असलेल्या दहा ते १२ वर्षाच्या मुलीला या तोतया व्यक्तीने वाईट हेतूने स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला. महिलेने जळगाव येथे नातेवाईकांना फोन करुन बसस्थानकात बोलावून घेतले.  बस स्थानकावर बस पोहोचल्यावर बंगाली दांपत्यास महिलेने व तिच्या नातेवाईकांनी चपलेने चोपले. त्याची पत्नी मात्र विनवण्या करीत होती.