मुंबई : पाली हिल परिसरात मध्यरात्री वेगाने फरारी चालवून रहिवाशांची झोपमोड करणारा अभिनेता इमरान खान विरोधात पाली हिल रेसिडेंटस् असोसिएशनने खार पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली आहे. आणि तक्रारीनंतर इमरान खान याला याप्रकरणी समज देण्यात आल्याचे खार पोलीस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यांपासून इमरान येथे रात्री १२ ते २ वाजण्याच्या सुमारास वेगाने फरारी चालवित रहिवाशांची झोपमोड करत आहे. शिवाय त्यामुळे रहिवाशांची डोकेदुखी वाढत आहे, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेकवेळा विनावण्याकरूनदेखील इमरानकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पोलीसांची मदत घेण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नसल्याचे असोसिएशनचे म्हटले आहे.दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार,इमराज खानने मला आठ महिन्यांची मुलगी आहे. आणि तिलादेखील याचा त्रास होणार असेल तर मी असा वेडेपणा कसा करेल. कोणताही शेजारी माझ्याकडे अशी तक्रार घेवून आला नव्हता. किंवा संदेशही पाठविला नव्हता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी गाडी माझ्या काकांच्या घरी आहे. आणि गेल्या तीन महिन्यांपासून माझी फरारी गॅरेजमध्ये आहे, असा खुलासा केला आहे. (प्रतिनिधी)
इमरान खानला पोलिसांची ताकीद
By admin | Updated: February 15, 2015 01:01 IST