Join us  

अटक केलेल्या ‘त्या’ हिंदू युवकांचा पोलिसांकडून छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:31 AM

नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या संशयाखाली अटक केलेल्या हिंदू युवकांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेने केला आहे.

मुंबई : नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या संशयाखाली अटक केलेल्या हिंदू युवकांना पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तपास अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात परिषदेचे अधिवक्ता अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच आरोपींसह तपास अधिकाºयांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे.पुनाळेकर म्हणाले की, दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकर याची भेट घेतली असता ही माहिती मिळाली. राजेश बंगेरा आणि अमोल काळे यांना कोल्हापूर तपास पथकातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाºयाने बेलापूर येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयात घुसून अमानुष मारहाण केली. तसेच कॉ. पानसरे प्रकरणातील सहभागाची कबुली न दिल्यास यापेक्षा गंभीर छळाला तोंड द्यावे लागेल, अशी धमकीही दिल्याचे शरदशी बोलताना कळाले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची वकिलांनी सोमवारीच भेट घेतली असता शासनाच्या याच अधिकाºयाने नंदकुमार नायर यांच्या उपस्थितीत अत्यंत हिंस्रपणे मारहाण केल्याचे अंदुरे याने सांगितले.आरोपींनी गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून मारहाण करणारे अधिकारी कुटुंबांवर अत्याचार करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही पुनाळेकर यांनी केला आहे. तरी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आरोपींसह तपास अधिकाºयांची नार्को चाचणी करण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली आहे. प्रसंग पडल्यास आरोपींच्या वकिलांचीही नार्को चाचणी करावी, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे पाठविल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकर