Join us

जनावरे चोरणारी चौकडी पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: September 15, 2014 23:09 IST

येथील गिरनोली भागातून जनावरांची चोरी करून पळून जाणा:या चार आरोपींना जागृत नागरिकांनी पकडून पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

पालघर : येथील गिरनोली भागातून जनावरांची चोरी करून पळून जाणा:या चार आरोपींना जागृत नागरिकांनी पकडून पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
पालघरमधील रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याचा फायदा घेत भिवंडी, मुंब्रा, मुंबई भागांतील गायी, म्हशी चोरणा:या टोळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत. जनावरे चोरटय़ांना विरोध करणा:या नागरिकांवर या चोरटय़ांकडून जीवघेणो  हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. 
पालघर नगर परिषदेकडेही कोंडवाडय़ांची व्यवस्था नसल्याने या मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे वाढत्या जनावरांच्या संख्येचा फायदा घेऊन सफाळे भागातून जनावरे चोरणा:या टोळीला सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली होती. 
त्यानंतर, काल गिरनोली भागातून टेम्पोद्वारे जनावरे चोरून पळणा:या आरोपींना ग्रामस्थ गणोश पाटील, अरुण पाटील, रघुनाथ पाटील, भूपेश पाटील, पद्माकर पाटील, भगवान घरत इत्यादींनी पकडून पालघर पोलिसांच्या हवाली केले. पालघर पोलीस ठाण्यात मिनाज आम्बारे, चेतन खेडकर, सैफ कुरेशी, साजीद इ. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. (वार्ताहर)
 
4पालघरमधील रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्याचा फायदा घेत भिवंडी, मुंब्रा, मुंबई भागांतील गायी, म्हशी चोरणा:या टोळ्या या भागात सक्रिय झाल्या आहेत. जनावरे चोरटय़ांना विरोध करणा:या नागरिकांवर या चोरटय़ांकडून जीवघेणो  हल्ले केले जात आहेत.