Join us

पोलीस कर्मचा:याची गोळी झाडून आत्महत्या

By admin | Updated: November 14, 2014 01:44 IST

बोरिवली येथील सिध्दीविनायक सोसायटीत राहणा:या केतन पाथाडे या पोलीस शिपायाने सव्र्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या करण्याची घटना गुरु वारी दुपारी घडली.

मुंबई: बोरिवली येथील सिध्दीविनायक सोसायटीत राहणा:या केतन पाथाडे या पोलीस शिपायाने सव्र्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या करण्याची घटना गुरु वारी दुपारी घडली. गेल्या कित्येक दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता.
   काही महिन्यांपूर्वीच केतनचा विवाह झाला होते. दोन महिन्यांपूर्वी तो पोलीस दलातील संरक्षण विभागात रु जू झाला होता. केतनची पत्नी गरोदर असल्यामुळे माहेरी राहण्यासाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचे डोहाळ जेवणाचा कार्यक्र म झाला होता. घरात एकीकडे आनंदाचे वातावरण असताना केतन मात्न काही कारणास्तव नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याच्या मनात हा आत्महत्येचा विचार डोकावला. तो त्यासाठी संधी शोधत 
होता.
 संध्याकाळी त्याची पत्नी त्याला सतत फोन करत होती. मात्न तो तिच्या फोनला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे तिने शेजा:यांना फोन करून घरी पाहण्यास सांगितले. वारंवार दार ठोठावून प्रतिसाद न मिळाल्याने शेजा:यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडला असता तो रक्ताच्या थारोळ्य़ात पडलेला 
आढळला.     
पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यात त्याने प}ीला उद्देशून ‘तू माङयावर खुप प्रेम केले. तेव्हढे प्रेम माङया मुलावरही कर. 
मी तुझी साथ सोडून जात असल्याबद्दल माफ कर’ असे लिहीले आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली.  (प्रतिनिधी)