Join us

पोलीस नाईक व वरिष्ठ पोलीस निरीक्षकास लाच घेताना अटक

By admin | Updated: July 4, 2014 00:41 IST

न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोकरे व पोलिस नाईक मच्छींद्र कोळी यांना ८० हजार रूपये लाच घेत असताना अटक करण्यात आली.

नवी मुंबई : न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोकरे व पोलिस नाईक मच्छींद्र कोळी यांना ८० हजार रूपये लाच घेत असताना अटक करण्यात आली. इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. द्रोणागिरीमध्ये बांधकाम व्यावसायीक म्हणून काम करणार्‍या व्यक्तीला, त्यांच्या इमारतीचे बांधकाम धोकादायक आहे, इमारतीवर कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज आले आहेत. तक्रार टाळण्यासाठी १ लाख रूपये द्या अशी मागणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोकरे व पोलीस नाईक मच्छींद्र कोळी यांनी केली होती. आज यापैकी ८० हजार रूपये स्वीकारताना या दोघांना पोलीस स्टेशनसमोरील रोडवर अटक केली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकास लाच घेताना अटक केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक जयराज छापरीया यांनी कळविले आहे.