Join us

राज्यातील ५७ पोलीस अधिकारी-अंमलदाराना पोलीस पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य पोलीस दलात गुणवत्ता, शौर्यपूर्ण व विशेष उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या ५७ अधिकारी-अंमलदाराना राष्ट्रपती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलात गुणवत्ता, शौर्यपूर्ण व विशेष उल्लेखनीय सेवा बजाविणाऱ्या ५७ अधिकारी-अंमलदाराना राष्ट्रपती व पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक प्रभातकुमार, फोर्सवनचे प्रमुख सुखविंदर सिंग, पुण्यातील सहआयुक्त रवींद्र शिसवे, नवी मुंबईतील पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आदींचा समावेश आहे. केंद्रीय गृह विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये १३ शौर्य, ४ विशेष उल्लेखनीय आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पुरस्कारांचा समावेश आहे.

मुंबई प्रादेशिक विभागातील पदक विजेत्यांची नावे : (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक

अप्पर महासंचालक सर्वश्री प्रभातकुमार (एसीबी), सुखविंदर सिंग (फोर्सवन), एसीपी निवृत्ती (गुन्हे शाखा, ठाणे शहर), निरीक्षक विलास गंगावणे (शाहु नगर पोलीस ठाणे माहिम पूर्व, मुंबई)

पोलीस शौर्य पदक :

अतिरिक्त पोलीस अध‍ीक्षक राजा आर, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, हवालदार सर्वश्री महादेव मडावी, कमलेश अर्का, हेमंत मडावी, अमुल जगताप, वेल्ला आत्राम, सुधाकर मलय्या मोगलीवार, बियेश्वर गेडाम, निरीक्षक गजानन पवार, एसीपी हरी बालाजी एन, हवालदार सर्वश्री गिरीश ढेकळे व नीलेश मारोती धुमणे.

पोलीस पदक :

सहआयुक्त रवींद्र श‍िसवे (पुणे), प्रवीणकुमार पाटील (उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई), वसंत जाधव (अधीक्षक, भंडारा), कल्पना गाडेकर, (एटीएस, सायबर, मुंबई), संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो (उपअध‍ीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे), दिनकर मोहिते, (एसीपी, ठाणे), निरीक्षक विजय डोळस (ठाणे शहर), रवींद्र दौंडकर (वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई), राजू बिडकर (डी.बी. मार्ग, पोलीस ठाणे), अजय जोशी (गुन्हे शाखा, अंधेरी), प्रमोद सावंत (तंत्रज्ञान कक्ष, मुंबई), उपनिरीक्षक रमेश कदम (ठाणे शहर), सहायक फौजदार सर्वश्री हेमंत राणे, (श‍िवडी पोलीस ठाणे, मुंबई), हेमंत पाटील (रायगड), जीवन जाधव (सी.आय.यु. ब्रँच, पोलीस आयुक्तालय, मुंबई), राजेंद्र मांडे (कर्जत, रायगड), उदयकुमार पलांडे (उल्हासनगर, ठाणे शहर), थॉमस डिसोझा (मुख्यालय, ठाणे), प्रकाश चौगुले (रेल्वे मुंबई).