Join us
Daily Top 2Weekly Top 5

तोतया पोलिसांनी प्रवाशाला लुटले

By admin | Updated: April 20, 2015 22:44 IST

गुजरातहून मुंबईकडे जाणारी इनोव्हा कार अडवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. तुम्ही आपल्या वाहनातून गुटखा आणि बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक

डहाणू : गुजरातहून मुंबईकडे जाणारी इनोव्हा कार अडवून आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत. तुम्ही आपल्या वाहनातून गुटखा आणि बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक करीत असल्याचे आम्हाला समजले आहे. असे सांगून तसेच दमदाटी करून चालक आणि त्याच्या सहप्रवाशाकडून २५ हजार लुटल्याची घटना शनिवारी कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मदनकुमार पोरवाल मेहता वर्मा (५०) रा. सेलवास या फिर्यादीने कासा पोलीसात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी त्या चौकडीला बेड्या ठोकल्या. आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी रवी मगर यांनी दिली. कासा पोलीसांच्या कारवाईमुळे प्रवासीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)