मनोर : मनोर-विक्रमगड रस्त्यावर एस टी व टेम्पोची टक्कर होऊन अपघात झाल्याने वसई विरार महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी जाणारे नरेंद्र गोपाल पोवार (२३) रा. मोखाडा हे पोलीस ठार तर, एस.टी मधील १९ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ८.३०च्या सुमारास घडली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला.पालघर -शिरपूर एस.टी सकाळी मनोर-विक्रमगडला जात असताना बांगर चोळा गावाच्या हद्दीतील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. यात एसटीमधील रंजनी आत्माराम संखे (६५), आत्माराम जनार्दन संखे (७०) रा. पालघर, अरूणदाती अंता राऊत (५३) रा. सिरगाव, अनिता पाटील (३५), राहुल सिदोसे बस चालक रा. पालघर, नदीम बापु कुरेशी (२५) रा. जव्हार, बाबु कुरेशी (७५), जमिला बाबु कुरेशी (६५) जव्हार, साजिदा अन्सार कुरेशी (३०) जव्हार यांच्यासह अन्य जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मनोर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मारोती पाटील, हवालदार दया पाटील, गायकवाड, भुसाळा, एम. जी. पाटील व इतर पोलीस कर्मचारी घटनेस्थळी पोहचले. (वार्ताहर)
बस-टेम्पो अपघातात पोलीस ठार
By admin | Updated: June 14, 2015 22:50 IST
मनोर-विक्रमगड रस्त्यावर एस टी व टेम्पोची टक्कर होऊन अपघात झाल्याने वसई विरार महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी जाणारे नरेंद्र गोपाल पोवार
बस-टेम्पो अपघातात पोलीस ठार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}