Join us

पोलीस जीप घसरून तिघे जखमी

By admin | Updated: December 5, 2014 00:17 IST

अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील धरमतर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या खडी मातीच्या ढिगाऱ्यावरुन पोलीस जीप स्लीप झाली.

बोर्ली : अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील धरमतर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या खडी मातीच्या ढिगाऱ्यावरुन पोलीस जीप स्लीप झाली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गुलाब भगवान वानखेडे (४२, रा. पोलीस मुख्यालय, अलिबाग) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुलाब भगवान वानखेडे हे पोलीस जीपकारमधून पोलीस हवालदार रघुपती ठाकूर, पोलीस शिपाई बाळासाहेब घोरपडे (२६, दोघेही रा. पोलीस मुख्यालय अलिबाग) हे खालापूर पोलीस जवानांसह मुंबई - पुणे रोड येथून अलिबागेत येत असताना फौजी ढाब्याच्या पुढे धरमतर पेट्रोलपंपाजवळ जाणाऱ्या मिनिडोअर विक्रम चालकाने पेट्रोल पंपाजवळ जाणाऱ्या रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून ठोकर मारली. याचवेळी आलेली पोलिसांची जीप खडी मातीच्या ढिगाऱ्यावरुन घसरली. या अपघातात पोलीस हवालदार रघुपती ठाकूर, पोलीस शिपाई बाळासाहेब घोरपडे व स्वत: गुलाब वानखेडे हे जखमी झाले. या जखमींना अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात १०८ च्या रुग्णवाहिकेने पोहोचवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. (वार्ताहर)