कारच्या धडकेत पोलीस जखमी
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST
कारच्या धडकेत पोलीस जखमी
कारच्या धडकेत पोलीस जखमी
कारच्या धडकेत पोलीस जखमीमुंबई: भरधाव वेगात आलेल्या कारने पोलीस कर्मचार्याला धडक दिल्याची घटना शुक्रवारी कुलाबा येथे घडली आहे. याबाबत कुलाबा पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. स्वप्नील कुंभार (३३) असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते कुलाबा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे कुंभार दुचाकीवरुन गस्त घालत होते. दरम्यान कुलाब्यातील दिलीप सरदेसाई चौकात अचानक एक कार त्यांच्या पाठून आली. कार चालकाचे कारवरील नियत्रंण सुटल्याने कारने कुंभार यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर उपचारासाठी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर कुलाबा पोलिसांनी कार चालक अनुप नहार (२८) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)