Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाची आत्महत्या

By admin | Updated: December 23, 2016 03:52 IST

राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंधेरीत घडली. श्रीनिवास

मुंबई : राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी अंधेरीत घडली. श्रीनिवास हिरामणी कुंभारे (४३) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. आजाराला कंटाळून कुंभारे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अंधेरी पूर्वेकडील म्हाडा पोलीस कॉलनीत दोन लहान मुली, एक मुलगा व पत्नीसह कुंभारे राहत होते. ते मेघवाडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास कुंभारे यांनी सहा मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवला. (प्रतिनिधी)