Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो, शिस्त पाळा

By admin | Updated: July 21, 2014 00:46 IST

दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्ती असताना ते न वापरता वाहतुकीचे नियम शिकविणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांकडूनही त्याबाबत उघडपणे उल्लंघन केले जाते

पंकज रोडेकर, ठाणेदुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्ती असताना ते न वापरता वाहतुकीचे नियम शिकविणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांकडूनही त्याबाबत उघडपणे उल्लंघन केले जाते. याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर पोलिसांनाही शिस्त लावण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेला हे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असल्याचे दिसत आहे. सोमवारपासून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांनो सावधान! आपलाच सहकारी आपल्याविरोधात कारवाई करण्यासाठी पुढे तैनात आहे, हे लक्षात ठेवावे. त्याचबरोबर दुचाकींवर ‘पोलीस’ असे लिहिणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत एकूण १८ युनिट आहेत. या युनिटद्वारे ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर आणि भिवंडी, नारपोली हे परिसर येतात. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी रस्ते मात्र तेवढेच आहेत. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळते. याबाबत वारंवार वाहतूक शाखेकडून जनजागृती करूनही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.