Join us

पोलिसांनी उधळली बेकायदा पार्टी

By admin | Updated: March 15, 2015 01:03 IST

परवाना रद्द केलेल्या ‘स्क्रिम द क्लब’ या हॉटेल लि मेरीडीयनमधील पबवर शुक्रवारी रात्री छापा टाकून एका बड्या कंपनीच्यावतीने येथे आयोजित केलेली बेकायदा पार्टी पोलिसांनी उधळली.

मुंबईच्या बारबालांसह तेरा जणांना अटकपुणे : वर्षभरापूर्वी पोलिसांनी परवाना रद्द केलेल्या ‘स्क्रिम द क्लब’ या हॉटेल लि मेरीडीयनमधील पबवर शुक्रवारी रात्री छापा टाकून एका बड्या कंपनीच्यावतीने येथे आयोजित केलेली बेकायदा पार्टी पोलिसांनी उधळली. मुंबईच्या नऊ बारबालांसह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.या बड्या कंपनीच्या वतीने राज्यभरातील वितरकांसाठी स्क्रिम द क्लब या पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच दसरा आणि दिवाळीदरम्यान कंपनीच्या उत्पादनांचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या वितरकांना बक्षीस वितरणही करण्यात येणार होते. त्यामुळे राज्यभरामधून कंपनीचे सर्व वितरक आलेले होते. आयोजकांनी या पार्टीमध्ये नाचण्यासाठी मुंबईहून नऊ तरुणींना बोलावले होते. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून बंडगार्डन पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी पबमध्ये सुमारे ४० वितरक होते. त्या सर्वांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात वितरकांनी मद्यप्राशन अथवा अमलीपदार्थ घेतले नसल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी लि मेरीडीयनचे मालक श्रीराम अगरवाल यांच्यासह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.