Join us

अश्लील हावभावांमुळे पोलीस अडचणीत

By admin | Updated: November 11, 2014 01:47 IST

अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेल्या लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे याला वरिष्ठ अधिका:यांनी आज निलंबित केल्याची माहिती मिळाली.

मुंबई: गावदेवीमध्ये एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या 35 वर्षीय महिलेशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेल्या लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे याला वरिष्ठ अधिका:यांनी आज निलंबित केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अद्याप तपास सुरु असून येडे यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती गावदेवी पोलिसांनी दिली.
मूळची अहमदाबाद येथील रहिवाशी असलेली 35 वर्षीय विवाहिता तिच्या पती आणि मित्रंसोबत गावदेवी परिसरातील कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये असलेल्या फ्लुट रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री जेवणासाठी आली होती. महिलेचा पती बूट बनविणा:या कारखान्याच्या मालक असून तब्बल 5क् जण एका मित्रच्या बर्थडे पार्टीला आले होते. शनिवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास याच रेस्टारंटमध्ये समोरच्या टेबलावर बसलेला लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप येडे जेवणासाठी आला होता. येडे हा आपल्याकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे लक्षात येताच विवाहितेने याची माहिती पती आणि तिच्या मित्रंना दिली. त्यानी याचा जाब येडेला विचारताच दोघांमध्ये भांडणो झाली. हॉटेलमध्ये कर्मचा:यांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवताच येडे तेथून निसटला. मात्र या येडेचे ओळखपत्र रेस्टॉरंटमध्ये पडले आणि तो फसला. (प्रतिनिधी)
 
महिलेने पतीसोबत गावदेवी पोलीस ठाणो गाठून याची तक्रार दिली. याप्रकरणी येडेविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल करुन गावदेवी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान पुणो पोलिसांना याची माहिती मिळताच येडे याला निलंबित करण्यात आले.