Join us

बलात्काराच्या गुन्ह्यातील हद्दपार आरोपीची पोलिसांना दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:09 IST

मुंबईबलात्काराच्या गुन्ह्यात मुंबईतून हद्दपार करण्यात आलेल्या ३५ वर्षीय सराईत आरोपीला पकडताच त्याने पोलिसांनाच अरेरावी करत अंगावरील कपडे फाडून ...

मुंबई

बलात्काराच्या गुन्ह्यात मुंबईतून हद्दपार करण्यात आलेल्या ३५ वर्षीय सराईत आरोपीला पकडताच त्याने पोलिसांनाच अरेरावी करत अंगावरील कपडे फाडून पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी अटक केली आहे. सुदय ऊर्फ सुधीर गिरव यादव, असे या आरोपीचे नाव आहे.

मुंबई पोलीस दलातील परिमंडळ २ च्या उपायुक्तांनी यादवला एका वर्षासाठी हद्दपार केले होते. यादव विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका बलात्काराच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता. तो मुलुंडमध्ये लपून बसल्याची माहिती काशिमिरा पोलिसांना मिळाली होती. काशिमिरा पोलिसांनी मुलुंडमध्ये येत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने स्वतःचे कपडे फाडून घेत पोलिसांना अरेरावी करत पोलिसांवरच आरोप करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विनापरवानगी शहरात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.