लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नातेवाइकांना भेटू न दिल्याच्या रागात पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी चौकशीअंती अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील रमेश कदमविरुद्ध गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात त्याला अटक केली. प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी आपल्याकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप करत कदमने शिवडी न्यायालयात पोलिसांविरुद्धच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. कदमने केलेल्या आरोपाची चौकशी सुरू आहे. चौकशीत जे समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी सांगितले
पोलिसांकडून पैशांची मागणी
By admin | Updated: May 31, 2017 04:28 IST