Join us  

आइसक्रीमचे पैसे मागितले म्हणून हवालदाराची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 6:58 AM

आइसक्रीम पार्लरच्या कर्मचाऱ्याने आइसक्रीमचे पैसे मागितले, म्हणून भांडुप वाहतूक शाखेतील पोलिसाने पट्ट्याने मारहाण केल्याच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे.

मुंबई : आइसक्रीम पार्लरच्या कर्मचाऱ्याने आइसक्रीमचे पैसे मागितले, म्हणून भांडुप वाहतूक शाखेतील पोलिसाने पट्ट्याने मारहाण केल्याच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. मारहाण करत असलेल्या पोलिसाचे नाव विजय गोसावी असून, तो भांडुपच्या सोनापूर वाहतूक शाखेतकार्यरत आहे. गोसावीला सध्या उत्कर्षनगर येथे पार पडत असलेल्या पोलीस भरती परीक्षा केंद्राजवळ कार्यरत आहे.भांडुप पूर्वेकडील रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. येथील आइसक्रीमवाल्याकडून आइसक्रीम घेतल्यानंतर, तेथील कर्मचाºयाने गोसावीकडे पैसे मागितले. याच रागात गोसावीने चक्क त्याला शिवीगाळी करत पट्ट्याने मारहाण केली. मात्र, नागरिकांनी हटकल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचा हा व्हिडीओ मंगळवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटनेमागचा गोसावीचा चेहरासमोर आला. या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या व्हिडीओचीसत्यता पडताळूनच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :गुन्हामुंबई