Join us

कजर्त परिसरात पोलिसांनी केली नाकाबंदी

By admin | Updated: September 16, 2014 22:41 IST

पुढील महिन्यात होणा:या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कर्जत पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे.

कजर्त : पुढील महिन्यात होणा:या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कर्जत पोलिसांनी नाकाबंदी सुरु  केली आहे. बेहिशेबी पैशांची ने-आण किंवा कोणत्याही प्रकारची हत्यारे आणू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी विनापरवाना गाडय़ा चालविणारे तसेच नंबर प्लेट नसलेल्या गाडय़ांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. 
विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ही नाकाबंदी त्वरित सुरू केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 15 ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार असल्याने निवडणूक जाहीर झाल्याबरोबर नाकाबंदी करण्याचा निर्णय कर्जत पोलिसांनी घेतला. कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील यांनी स्वत: जातीने लक्ष घालून कर्जतच्या चार फाटय़ावर नाकाबंदीला सुरुवात केली. त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना पवार, मारूती जाधव, वाहतूक शाखेचे सुरेश पाटील, शरद फरांदे, भाग्यश्री पाटील यांनी नाकाबंदीची अंमलबजावणी सुरु  केली. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीही यशस्वीरित्या नाकाबंदी केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यावेळी काही आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले होते. 
ही निवडणूक लोकसभेपेक्षा अत्यंत संवेदनशील असल्याने लगेचच नाकाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले व सहकार्य करण्याचे आवाहनही केले. या निवडणुकीत भांडणो होऊ नयेत, तसेच पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून ही नाकाबंदी करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात बेहिशेबी पैसे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसेच काही प्रमाणात हत्यारेही येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान काही दिवस आधी नाकाबंदी केली होती. तशीच यावेळीही निवडणुकीच्या थोडे दिवस आधी नाकाबंदी होईल या अपेक्षेत असलेल्यांची चांगलीच गोची आता होणार आहे आणि वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालविणा:यांनाही चाप बसणार आहे. (वार्ताहर)
 
्रपैशांचा गैरवापर रोखण्यासाठी
4कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील यांनी स्वत: जातीने लक्ष घालून कर्जतच्या चार फाटय़ावर नाकाबंदीला सुरु वात केली.  
4निवडणूक लोकसभेपेक्षा अत्यंत संवेदनशील असल्याने लगेचच नाकाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले व सहकार्य करण्याचे आवाहनही केले. या निवडणुकीत भांडणो होऊ नयेत, तसेच पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून ही नाकाबंदी करण्यात आली आहे.