Join us
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन पोलीस शिपायाची आत्महत्या

By admin | Updated: December 10, 2015 08:02 IST

जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशीरा घडली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशीरा घडली. चेतन सोनावणे (२७) असे त्यांचे नाव आहे. २००९च्या पोलिस बॅचचे आहेत. कल्याण येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली.
सोनावणे हे गेल्याच महिन्यात जुहू पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घरात एकटे असताना सोनावणे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 
त्यांच्या पश्चात त्यांची गरोदर पत्नी असून ती माहेरी गेली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.