Join us

आयुक्तालयात पोलीस नाईकांनी केली शिवीगाळ

By admin | Updated: December 22, 2015 02:09 IST

दारूच्या नशेत पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या पोलीस नाईकाने सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला.

दारूच्या नशेमध्ये सहकाऱ्यांना धक्काबुक्कीमुंबई : दारूच्या नशेत पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या पोलीस नाईकाने सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. शिवाजी गवस (३७) असे या पोलीस नाईकाचे नाव आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.वरळी पोलीस वसाहतीत राहणारा नाईक सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या त्याची नेमणूक पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशन कक्षात केली आहे. रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नाईक दारूच्या नशेत पोलीस मुख्यालयातील या कक्षात पोहोचला. तेथे त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस मुख्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.ही बाब वरिष्ठांना समजताच त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी नाईक याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)