ठाणे : रिक्षातील मुलींश्ी असभ्य वर्तन केल्याच्या घटनेनंतर नौपाडा पोलिसांनी सोमवारी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही दिली आहे. असभ्य वर्तन करणारा संशयित आरोपी तोच असल्याचा दावा नौपाडा पोलिसांनी केला आहे. परिस्थितीजन्य पुरावा आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आधी त्याला ताब्यात घेऊन नंतर चौकशीअंती अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.गुप्ता याच्या नातेवाईकांनी तो दोषी नसल्याचा दावा केला होता. मात्र, खबरी, स्थानिक रहिवासी आणि इतर माहितीच्या आधारे पुरेसा पुरावा मिळाल्यानंतरच त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रिक्षाचालकाचे वारंवार मागे वळून पाहणे मागे वळून पाहणे, हसणे या वागणुकीमुळे त्या दोघींनी जीव धोक्यात घालून रिक्षाबाहेर उडी घेतली. ग्रामीण भागातून आलेल्या या मुलींना रिक्षाचालकावर संशय आल्यानंतर त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा करूनही रिक्षा न थांबविता त्याने वेग वाढविल्यानेच त्यांनी अखेर उडी घेतल्याचे हा अभाविपच्या कार्यकर्त्याने सांगितले. (प्रतिनिधी)च्रिक्षातून उड्या घेतलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी एमएससीचे शिक्षण घेत आहे तर दुसरी अकरावीत शिकत आहे. च्दुसरी मुलगी अजूनही या घटनेच्या धक्क्यातून सावरली नसल्याचे पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांनी सांगितले. त्या दोघीही अभाविपच्या कार्यकर्त्या आहेत.
पकडलेला रिक्षावाला ‘तोच’ असल्याचा पोलिसांचा दावा
By admin | Updated: March 5, 2015 01:41 IST