Join us

पोलीस गाडीचा फटका

By admin | Updated: June 2, 2014 03:37 IST

वसई पोलिसांच्या रॅश ड्रायव्हींगचा फटका पारनाक्यातील काही दुकानांना शनिवारी रात्री बसला. पारनाका-झेंडाबाजार या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर हा प्रकार घडला

नायगाव : वसई पोलिसांच्या रॅश ड्रायव्हींगचा फटका पारनाक्यातील काही दुकानांना शनिवारी रात्री बसला. पारनाका-झेंडाबाजार या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार रात्री १ च्या सुमारास वसई पोलिसांची पेट्रोलींग बोलेरो जीप येथून सुसाट वेगात जात होती. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही जीप येथील देसाई प्लॅस्टीक दुकानचे शटर्स फोडून आत शिरली. त्याहीनंतर नजिकची भिंत फोडून लगतचे आदर्श शु मार्टच्या दुकानाच्या पुढची बाजु तोडून जीप थांबली. यात तब्बल चार दुकानांचे नुकसान झाले. दरम्यान, कुणाला ईजा झालेली नाही. वाहन पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक होते परंतु तसे न करता अपघातग्रस्त जीप अज्ञात गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वसई पोलीस स्थानकात पोलीस शिपाई संतोष परदेशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही नवीन जीप पोलीस सेवेत रुजू झाली होती. (वार्ताहर)