Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 03:26 IST

सांताक्रुझ पश्चिम येथील खोतवाडीत पालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेले दोन मजली बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला़ यामध्ये एच पश्चिम

मुंबई : सांताक्रुझ पश्चिम येथील खोतवाडीत पालिकेच्या मालकीच्या जागेवर असलेले दोन मजली बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला़ यामध्ये एच पश्चिम विभागाचे वसाहत अधिकारी सयाजी घाडगे यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या हल्ल्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन लोकेगावकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप पालिकेने केला आहे़ सांताक्रुझ येथील पालिकेच्या जमिनीवर आदम कासम चाळ येथे हे बेकायदा बांधकाम सुरू होते़ याबाबत माहिती मिळताच पालिकेने नोटीस बजावली होती़ तरीही तेथे बांधकाम सुरूच राहिल्यामुळे पालिकेच्या एच पश्चिम विभागातील कामगार व अधिकाऱ्यांनी आज कारवाई सुरू केली़ या कारवाईबाबत पालिकेचे काही कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले असताना लोकेगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढविला़पालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे़ लोकेगावकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एच पश्चिमचे सहायक आयुक्त यांनी पोलिसांकडे केली आहे़