Join us

पोलीस पुत्रावर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 06:27 IST

घराकडे जात असलेल्या एका पोलिसाच्या तरुण मुलाला तिघा गुंडांनी अडवून ब्लेडने खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे माहिम (प.) येथील शीतलादेवी मंदिराच्या परिसरात घडली.

मुंबई : घराकडे जात असलेल्या एका पोलिसाच्या तरुण मुलाला तिघा गुंडांनी अडवून ब्लेडने खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे माहिम (प.) येथील शीतलादेवी मंदिराच्या परिसरात घडली. यामध्ये केतन शशिकांत आरेकर (२१) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची शक्यता माहिम पोलिसांनी वर्तविली. हवालदार शशिकांत आरेकर हे माहिम येथील न्यू पोलीस कॉलनीत राहतात. त्यांचा मुलगा केतन हा शुक्रवारी पहाटे घराकडे येत होता. त्या वेळी मंदिराजवळील बेस्टच्या पोलजवळ त्याला तिघांनी अडविले. आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. त्याने विरोध केला असता एकाने धारदार ब्लेडने त्याच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली पडला असता तिघांनी पळ काढला.