Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 01:43 IST

गोवंडी परिसरातील एका रहिवाशांकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.

मुंबई : गोवंडी परिसरातील एका रहिवाशांकडून २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पालिकेच्या एका अधिकाऱ्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. अविनाश भोईटे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो पालिकेच्या एम पूर्व विभागातील भाडे संकलक या पदावर कार्यरत होता.या प्रकरणातील तक्रारदारांचे पालिकेचे भाडे थकले होते. थकीत भाडे घेण्यास आरोपीने नकार दिला. मात्र विनंती केल्यानंतर आरोपीने भाडे घेण्यास सहमती दर्शवली. परंतु यासाठी त्याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. (प्रतिनिधी)