Join us

पोलिसांना मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

By admin | Updated: May 12, 2015 03:25 IST

वाशी येथे दोघा पोलिसांना मारहाण करून पळालेल्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या इतर साथीदारांचा

नवी मुंबई : वाशी येथे दोघा पोलिसांना मारहाण करून पळालेल्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. दारूच्या नशेत कार भरधाव पळवताना कल्याण येथे कंटेनरला धडकल्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागले. संदेश पाटील (२६) आणि प्रदीप नाहक (२३) अशी त्यांची नावे आहेत.शनिवारी मध्यरात्री वाशी येथे एक स्विफ्ट कार भरधाव वेगात जात असल्याचे गस्तीवरील पोलिसांना दिसले. त्यांनी पाठलाग करून सेक्टर-११ येथे कार अडवली असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना मारहाण करून पळ काढला होता. पोलीस नाईक किशोर पवार जखमी झाले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आठ तरुणांनी दोन स्विफ्टमधून पळ काढला. दोघांना अटक करण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. मारहाणीनंतर वेगाने कल्याणकडे जाताना समोर चाललेल्या लॉरीला त्यांच्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने अपघात घडला. तिघेजण जखमी झाले असून ते कल्याणच्या रुग्णालयात असल्याचे सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड यांनी सांगितले. उपचारांनंतर त्यांना अटक केली जाणार असून इतर तिघांचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वजण कल्याण येथील डायघरचे रहिवासी आहेत. प्रदीप नाहक हा काही दिवसांपूर्वी बोनकोडे येथे राहायला आला होता, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)