Join us

पोलिसांची ५ हजार ८६२ वाहनचालकांवर कारवाई

By admin | Updated: March 7, 2015 00:54 IST

होळी आणि धूलिवंदन हे दोन्ही दिवस अनेक जण बेधुंद होऊन साजरे करतात. यामध्ये वाहनचालकांकडून तर वाहतुकीच्या नियमांना तिलांजली दिली

मुंबई : होळी आणि धूलिवंदन हे दोन्ही दिवस अनेक जण बेधुंद होऊन साजरे करतात. यामध्ये वाहनचालकांकडून तर वाहतुकीच्या नियमांना तिलांजली दिली जाते आणि यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. हे पाहता या दोन्ही दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांनी दिला होता. त्यानुसार दारू पिऊन वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट या गुन्ह्यांतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल ५ हजार ८६२ दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालक अडकले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी होळी आणि धूलिवंदन या दोन्ही दिवशी विशेष मोहीम हाती घेत ७0 ठिकाणी १,५00 वाहतूक पोलीस आणि १00 अधिकारी तैनात करण्यात आले. होळीच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही दिवशी दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांकडून दारू पिऊन वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि विना हेल्मेटचे प्रकार घडतात. त्यामुळे या चार गुन्ह्यांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. होळीच्या दिवशी एकूण ४0९ तर धूलिवंदनाच्या दिवशी तब्बल ५ हजार ४५३ केसेस दाखल झाल्याचे सह पोलीस (वाहतूक) आयुक्त बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविण्याच्या होळीच्या दिवशी १३0 केसेस, तर धूलिवंदनाच्या दिवशी २७९ केसेस दाखल झाल्या आहेत. तर धूलिवंदनाच्या दिवशी दुचाकीस्वारांच्या विरोधात विनाहेल्मेट केसेस सर्वाधिक दाखल झाल्या आहेत. अशा ४ हजार ८५१ केसेस दाखल झाल्याचे उपाध्याय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दोन दिवसांत अन्य ८ हजार ९८५ केसेसच्अन्य गुन्ह्यांतर्गत दाखल झालेल्या केसेसची संख्या ही ८ हजार ९८५ एवढी आहे. अन्य केसेसमध्ये वाहनचालकांकडे कागदपत्रे किंवा लायसन्स नसणे, सिग्नल तोडणे इत्यादी केसेसचा समावेश आहे. त्यामुळे दोन दिवसांत चार गुन्ह्यांतर्गत घडलेल्या केसेस आणि अन्य केसेसची संख्या पाहिल्यास ती १४ हजार ८४७ एवढी आहे. च्वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम उघडण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाई भोईवाडा, कुलाबा, चेंबूर, वाकोला, डी. एन. नगर, वान्द्रे, खार, सायन, वडाळा, बोरीवली, कांदिवली, गोरेगाव, मालाड या ठिकाणी झाल्याचे सांगण्यात आले. दिनांकदारू पिऊन विनाहेल्मेट ट्रिपल सीटअतिवेगाने वाहन चालविणेवाहन चालविणे५ मार्च१३0 २६३१0६६ मार्च२७९ ४,८५१२४३८0